नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वे स्थलांतरित कामगारांना आपापल्या घरी पोचवण्यासाठी येत्या १० दिवसांत आणखी २ हजार ६०० श्रमिक विशेष रेल्वेगाड्या सोडणार आहे. त्यातून ३६ लाख कामगारांना प्रवास करता येईल.
१ मे पासून सुरु झालेल्या या सुविधेमुळे आजपर्यंत राज्यसरकारांच्या मागणीनुसार २ हजार ६०० गाड्यांमधून ३६ लाख कामगार, विद्यार्थी, यात्रेकरु, पर्यटक इत्यादी प्रवासी आपापल्या घरी पोचू शकले. श्रमिक गाड्यांखेरीज १५ विशेष गाड्याही रेल्वेने चालवल्या असून येत्या १ जून पासून आणखी २०० गाड्या धावणार आहेत.