नवी दिल्ली : केंद्र सरकार खरेदी करत असलेली PPE कीट्स पूर्णपणे सुरक्षित असल्याची ग्वाही केंद्र सरकारनं दिली आहे. PPE कीट्सच्या दर्जाबाबत माध्यमांमध्ये शंका व्यक्त होत आहे, या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारनं एका निवेदनामधून हे स्पष्ट केलं असून, मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये चाचणी केल्यावरच ही किट्स खरेदी केली जातात, असं यात म्हटलं आहे.
देशात रोज ३ लाखाहुन जास्त PPE किट्स आणि N-95 मास्कचं उत्पादन होत असून, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून होत असलेल्या मागणीची पूर्तता होत असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.