नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लघु उद्योगांना आर्थिक पाठबळ देता यावं यासाठी सरकार कर्ज उलब्ध करून देणाऱ्या नव्या संस्थांचा शोध घेत असल्याचं केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. यासाठी बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना बळकटी देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.
ते आज लघु उद्योग क्षेत्रावर कोविड १९चा परिणाम आणि उपाययोजनांसंदर्भात कोलकाता चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलत होते. सध्याचा काळ संकटांचा असल्यानं सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
लघु उद्योगांना सरकार शक्य ती सर्व मदत देईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.