मुंबई (वृत्तसंस्था) : अमरावती विभागातल्या पाच जिल्ह्यांमधल्या बालभारती कार्यालयात आज पाठ्यपुस्तकांची पहिली खेप रवाना झाली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पाठ्यपुस्तक मंडळानं शालेय पुस्तकांची मोफत छपाई केली असून, ६२ लाखापेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी हे नियोजन केलं असून अमरावती विभागातल्या एकूण ५६ पंचायत समित्यांना आजपासून पुस्तकं उपलब्ध केली जाणार असल्याचं बालभारतीच्या भांडार व्यवस्थापकांनी सांगितलं.