पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई -पुणे महामार्गावरील तळेगाव टोल नाका व खंडाळा येथील वन विश्रामगृहा समोरील तपासणी केंद्र येथे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भेट देवून तेथील पल्स ऑक्सी मिटर, थर्मल स्कॅनर मशीनव्दारे ये-जा करणाऱ्या वाहनांतील नागरिकांच्या तपासणी नोंदणी रजिस्टरची पाहणी करुन तेथील कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली . तसेच तपासणी करतांना कोणकोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे. याबाबत आवश्यक त्या सूचनाही डॉ.म्हैसेकर यांनी केल्या.

यावेळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस अधिकारी, नवनीत कुमार कॉवत, कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे अतिरिक्त आयुक्त शंतनु गोयल, सहायक आयुक्त संदीप कदम, सहायक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.अजय बेंद्रे, मावळचे तहसिलदार श्री. बर्गे, पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.