नवी दिल्ली : सरहद्दीजवळ समग्र आणि व्यापकरित्या पायाभूत सुविधांचा विकास केला जात असून सर्व प्रकारच्या हवामान स्थितीत सुरळीतपणे संपर्क राहील आणि संरक्षणसिद्धता वृद्धींगत होईल अशा पद्धतीने रस्ते, रेल्वे मार्ग आणि बोगदे बांधले जात आहेत.

बॉर्डर रोडस् ऑर्गनायझेशनने (2018-19 ते 2022-23) या पाच वर्षांसाठी 14,545 किलोमीटर लांबीचे 272 रस्त्यांचे बांधकाम/सुधारणा यासाठी आराखडा तयार केला आहे. त्यापैकी 3323.57 किलोमीटर लांबीचे 61 रस्ते व्यूहरचनात्मक आहे. 2304.65 किलोमीटरच्या रस्त्यांचे काम झाले असून बाकीचे प्रगतीपथावर आहे.

संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.