नवी दिल्ली : पेट्रोलियम क्षेत्राने वर्ष 2018-19 मध्ये रोजकोषात 595,438 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. यात केंद्रीय राजकोषात 365,113 तर राज्यांच्या राजकोषात 230,325 कोटी रुपयांचे योगदान आहे.

2018-19 या वर्षात आयओसीएलने 16,894 कोटी रुपयांचा नफा कमावला. एचपीसीएलने 6,029 कोटी रुपये तर बीपीसीएलने 7,132 कोटी रुपये नफा कमावला.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.