नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय डिजिटल आरोग्य ब्ल्यूप्रिंट अहवाल प्रकाशित केला. सूचनांसाठी www.mohfw.gov.in वर तीन आठवड्यांसाठी तो उपलब्ध असेल.
सर्वांपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार प्रतिबद्ध असल्याचे डॉ. हर्ष वर्धन यांनी यावेळी सांगितले. डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत प्रत्येक व्यक्तीच्या दारापर्यंत सेवा पोहोचवण्यासाठीच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनानुसार ब्ल्यूप्रिंट असल्याचे त्यांनी सांगितले.
विविध डिजिटल आरोग्य सेवांच्या एकात्मिकीकरणावर त्यांनी भर दिला.