नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या काही दिवसात केरळातून १०० हून अधिक डॉक्टर आणि नर्स मुंबईत दाखल होणार आहेत. तिरुअनंतपुरमच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे उप अधिष्ठाता डॉ संतोष कुमार यांनी पीटीआयला ही माहिती दिली आहे.
ते यापूर्वीच मुंबईत पोहोचले आहेत. सेव्हन हील्स रुग्णालयात ते कार्यरत आहेत. यापैकी १६ डॉक्टर आज मुंबईत येण्याची शक्यता आहे. तर आणखी ५० डॉक्टर आणि १०० नर्स येत्या काही दिवसात पोहोचतील, असे ते म्हणाले.
केरळ आणि मुंबईची तुलनाही त्यांनी फेटाळून लावली आहे.केरळमध्ये मुंबईसारखं कुठलंही शहर नाही. इथे लोकसंख्या जास्त आहे, झोपडपट्टी आहे. त्यामुळे इथल्या समस्या वेगळ्यापद्धतीने हाताळण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.