मुंबई : नागपूर येथे आंतरराष्ट्रीय प्रवासी व माल वाहतूक हब विमानतळ विकसित करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मिहान प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या ९९२ कोटींच्या अतिरिक्त खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याचा निर्णय झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
नागपूर येथे आंतरराष्ट्रीय प्रवासी व माल वाहतूक हब विमानतळ विकसित करण्यासाठी मिहान प्रकल्प राबविण्यात येत आहे. मिहान प्रकल्पाबरोबरच आर्थिक उलाढालींचा विकास करण्यासाठी विशेष आर्थिक क्षेत्र विकसित करण्यासह वेळोवेळी प्रकल्पात सुधारणा करण्यात आल्या आहेत. मिहानसाठी आवश्यक भूसंपादन, पुनर्वसन, तांत्रिक कामे, भूसंपादन अधिनियमांतर्गत दावे इत्यादी कामांसाठी १ हजार ५०८ कोटी ३६ लाखांच्या खर्चास यापूर्वीच प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. आता या कामांसाठी सुमारे ९९२ कोटी ९ लाखांच्या अतिरिक्त खर्चास सुधारित प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे.