नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नासाच्या दोघा अंतराळवीरांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात प्रवेश केला आहे. बॉब बेह्नकेन आणि डग हर्ले असं त्यांचं नाव आहे. काल खासगी अंतराळ यान आणि रॉकेटच्या माध्यमातून त्यांनी अवकाशात झेप घेतली होती.

१९ तासाचा प्रवास करून ते अंतराळ स्थानकात पोहोचले आहेत. अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयत्न होता. हे दोघे अंतराळ स्थानकात सुखरुप पोहोचल्याने स्पेस एक्स या खासगी कंपनीच्या प्रयत्नांना यश आले आहे.

दरम्यान या यशस्वी कामगिरीबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं नासा आणि स्पेस एक्स कंपनीचं अभिनंदन केलं आहे.