नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना दिलासा देत केंद्र सरकारने १४ धान्यांची किमान आधारभूत किंमत वाढविली आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीकाच्या खर्चाच्या तुलनेत ५० ते ८३ टक्के परतावा मिळू शकणार आहे. तांदूळ ५३ रुपये, ज्वारी ७0रुपये, बाजरी १५० रुपये, नाचणी १४५ रुपये, मका ९० रुपये, तूर २०० रुपये, मूग १४६ रुपये, उडीद ३०० रुपये, भूईमूग १८५ रुपये, सूर्यफूल २३५ रुपये, सोयाबीन १७० रुपये, तीळ ३७० रुपये, कापूस २६० रुपये, अशी ही वाढ करण्यात आली आहे. याशिवाय शेतकऱ्यांना कर्जफेड करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसंच वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३ टक्क्यांपर्यंत व्याजात सवलतही दिली जाणार आहे.