मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री सहायता निधीला आत्तापर्यंत १ लाख २९ हजार जणांनी मदत केली असून, त्यातून आतापर्यंत ३६१ कोटी ३२ लाख ५७ हजार ५९९ रुपये जमा झाले असल्याची माहिती राज्य सरकारनं दिली आहे.

यापैकी १२३ कोटी ३९ लाख १२ हजार ४१० रुपये राज्य सरकारनं कोरोना विषयक कारणांसाठी खर्च केले आहेत असं यासंबंधी सरकारनं दिलेल्या माहितीत म्हटलं आहे.

खर्च झालेल्या रकमेपैकी औरंगाबाद जवळ झालेल्या रेल्वे अपघातातल्या मजुरांना ८० लाख रुपयांची मदत, श्रमिक रेल्वे गाड्यांच्या तिकीटाच्या खर्चापोटी ९७ कोटी ६९ लाख ५५ हजार ४९० रुपये, सेंट जॉर्ज रुग्णालयासाठी २० कोटी, कोविड चाचण्यांसाठी ३ कोटी ८२ लाख ५० हजार रुपये आणि रत्नागिरी इथल्या प्रयोगशाळेसाठी १ कोटी ७ लाख ६ हजार ९२० खर्च केल्याचं शासनानं म्हटलं आहे.