Blood sample with respiratory coronavirus positive
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था आयसीएमआरने गेल्या २४ तासात कोविड संदर्भात एक लाख २८ हजार ६८६ नमुन्यांचं परीक्षण केलं आहे. आता देशात परीक्षण केलेल्या नमुन्यांची संख्या ३९ लाख ६६ हजारावर पोहोचली आहे.
सध्या देशात ४७६ सरकारी तर २०५ खासगी अशा एकूण ६८१ प्रयोगशाळांमधून या चाचण्या केल्या जात असल्याचं, आयसीएमआरकडून सांगण्यात आलं.