मुंबई : राज्य सरकारने रायगड जिल्ह्यासाठी तातडीची मदत म्हणून १०० कोटी रुपये दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. निसर्ग चक्रीवादळामुळं नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. यासाठी ८-१० दिवसांचा वेळ लागेल. त्यानंतर सविस्तर अभ्यास करून पॅकेजची घोषणा केली जाईल, असे ते म्हणाले.

त्याप्रमाणे इतर जिल्ह्यांनाही मदत दिली जाईल असे ते म्हणाले. आज त्यांनी अलिबाग आणि परिसरातल्या काही भागात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या.