नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एचएसएनसी समूह विद्यापीठाचं आज उद्‌घाटन केलं. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर कौशल्य आधारीत शिक्षण आणि प्रशिक्षण देणं गरजेचं आहे, असं राज्यपालांनी यावेळी सांगितलं.

राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानाच्या माध्यमातून विविध महाविद्यालयांनी एकत्र येऊन समूह विद्यापीठं स्थापन करावित. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन एक मिशन म्हणून पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.

यावेळी एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या वेबसाईटचंही ऑनलाईन उद्‌घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. आपत्कालीन परिस्थितीत विविध माध्यमांचा उपयोग करुन, परीक्षा कधी सुरु होणार, यापेक्षा शिक्षण कसं सुरु राहील याकडे सर्वानी अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. शिक्षण घेताना विद्यार्थी अधिक आनंदी राहून कसे यशस्वी होतील याकडे महाविद्यालयांनी लक्ष द्यावं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रसंगी सांगितलं.

यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सचिव सौरभ विजय, एचएसएनसी समूह विद्यापीठाचे प्रमुख आणि महाविद्यालयांचे प्राध्यापक सहभागी होते.