नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुलडाण्यात कडुनिंबाच्या निंबोळ्यापासून शेतीपूरक कीटकनाशक तयार करण्याचा उपक्रम चालवला जात आहे. कृषी विभागाच्या पुढाकारानं महिला बचत गटांच्या मार्फत निबोळ्या गोळा करून निंबोळी अर्क तयार केला जात असून त्याचा उपयोग कीटकनाशक म्हणून होऊ शकेल.
या उद्योगामुळे शेतीच्या खर्चात बचत होऊन, महिलांना रोजगार मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.