मुंबई : राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दादर येथील चैत्यभूमीतील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळास राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी भेट देऊन अभिवादन केले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे सचिव नागसेन कांबळे, भन्ते धम्मप्रियजी, रामराव राठोड, अँँड. पद्माकर उगले उपस्थित होते.






