नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार वस्तू आणि सेवाकराचा परतावा देण्यासाठी सरकारनं ऑनलाईन प्रक्रिया सुरु केली आहे, असं समाजमाध्यमांवर पसरविण्यात आलेलं वृत्त खोटं असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. अशी कोणतीही प्रक्रिया सुरु केलेली नसून, यासंदर्भातल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये असं केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळानं म्हटलं आहे.