नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाकडे केंद्र शासनाने एनडीआरएफ निकषात बदल करून सुधारित निकषानुसार मदत करावी अशी मागणी राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी आज केलं.

चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून विस्थापितांना कायमस्वरूपी निवारा घरे मिळण्यासाठी निकषात बदल करणे आवश्यक असल्याचं तटकरे यांनी सांगितलं.परसबागेसाठी विशेष मदतीचे पॅकेज केंद्र शासनाने जाहीर करावं असंही त्या म्हणाल्या.

जिल्ह्यात झालेल्या  निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज नागाव, आक्षी, येथील शेतकर्यांरना भेटून नुकसानीची  पाहणी केली.