नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने २२ मार्च पासून लागू केलेल्या टाळेबंदीमध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पूर्णत: थांबवण्यात आली होती. या आधी ज्या प्रवाशांनी आपले मासिक किंवा त्रैमासिक पास काढले असतील, परंतु टाळेबंदीमुळे प्रवास करणं शक्य झाले नसेल, अशा प्रवाशांना त्यांच्या मासिक किंवा त्रैमासिक पाससाठी मुदतवाढ देण्यात येईल, अशी माहिती परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आहे.
ज्यांना या पासचा परतावा पाहिजे असेल त्यांना देखील तो देण्याची व्यवस्था एसटी महामंडळानं केली आहे, त्यासाठी संबंधित प्रवाशांनी जवळच्या आगारात जाऊन आगारप्रमुखांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज सादर करणं आवश्यक आहे , असं त्यांनी सांगितलं.