नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातला कोविड १९ बाधित रुग्णांचा बरं होण्याचा दर सुधारला असून तो ५२ पूर्णांक ७९ शतांश टक्के इतका झाल्याचं केंद्रसरकारनं म्हटलं आहे. देशात  आतापर्यंत एकूण १ लाख ८६ हजार ९३५ कोविड बाधित  रुग्ण बरे झाले असून गेल्या २४ तासांत ६ हजार ९२२ रुग्ण उपचारानंतर घरी परतले, तर सध्या १ लाख ५५ हजार २२७ रुग्ण उपचार घेत असल्याचं  सरकारी आकडेवारीत म्हटलं आहे.

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे १० हजार ९७४  हजार नवे रुग्ण आढळून आल्यानं कोविड बाधित रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ५४ हजार ६५ झाली, तर २ हजार ३ रुग्णांचा मृत्यू झाल्यानं कोविड आजारानं देशात  मृत्युमुखी पडणाऱ्यांची एकूण संख्या ११ हजार ९०३ वर पोहोचली. त्यामुळे देशाचा कोविड मृत्यु दर ३ पूर्णांक ३६ शतांश  टक्क्यावर पोहोचल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे.

दरम्यान गेल्या २४ तासांत देशात विविध ठिकाणी एकूण १ लाख ६३ हजार १८७ कोविड चाचण्या झाल्या असून आतापर्यंत केलेल्याला चाचण्यांची संख्या ६० लाख ८४ हजार २५६ इतकी असल्याचं ICMR  अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं म्हटलं आहे.

अधिकाधिक कोविड चाचण्या व्हाव्यात, यासाठी देशभरातल्या  सरकारी आणि खासगी प्रयोगशाळांना चाचणीसाठी परवाने देण्याचं काम सुरु असून आतापर्यंत देशात एकूण ९२४ कोविड चाचणी प्रयोगशाळा  कार्यान्वित झाल्याचं ICMR नं म्हटलं आहे.  त्यातल्या ६७४ प्रयोगशाळा सरकारी असून २५० प्रयोगशाळा खाजगी आहेत.

राज्यात काल आणखी दोन हजार ७०१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाल्यानं राज्यातली एकूण रुग्णसंख्या एक लाख १३ हजार ४४५ इतकी झाली आहे. काल या आजारानं ८० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या आजारानं ५ हजार ५३७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत ५७ हजार ८५१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या ५० हजार ४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात गेलया २४ तासात कोरोनाचे ७  नवे बाधीत रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातली  बाधितांची संख्या १३७ वर पोहोचली आहे.

परभणी तालुक्यातील जांब गावातली एक ७० वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या बाधितांची संख्या 94 वर पोचली आहे. आतापर्यंत ८६ जण कोरोनामुक्त झाले असून तिघांचा मृत्यू झाला आहे.

जालना जिल्ह्यातल्या आणखी १८ जणांचा कोरोना विषाणू लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या आता ३०८ झाली आहे. बाधितांमध्ये राज्य राखीव पोलीस दलाचे २ कर्मचारी आहेत.

रायगड जिल्हय़ात काल कोरोना बाधित रूग्णाची संख्या ४३ ने वाढून एकूण रूग्णाची संख्या आता १ हजार ८९६ झाली आहे. आज दोन रूग्णाचा मृत्यू झाला असून  आतापर्यंत जिल्हय़ात  ८४ रुग्णांचे कोरोना मुळे मृत्यू झाले आहेत. जिल्हय़ात आतापर्यंत  १ हजार ३८५ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

पालघर जिल्ह्यात दिवसभरात ५० नव्या रुग्णाची भर पडल्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोना बाधित रूग्णाची  संख्या २ हजार १६४ वर पोहचली आहे. आता जिल्ह्यातली कोव्हिड-१९ च्या रूग्णाची संख्या २ हजार १६४ इतकी झाली आहे. त्यापैकी ७१ जणांचा मृत्यु झाला आहे. ब-या झालेल्या १ हजार १३ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलाय. तर जिल्ह्यात सध्या १ हजार ८० ऍक्टिव्ह केसेस आहेत.

पालघर जिल्ह्यात सर्वात जास्त, १ हजार ६८० इतकी रुग्ण संख्या आणि सर्वात जास्त ६३ मृत्यु देखील वसई – विरार महानगरपालिका क्षेत्रात झालेत.

सातारा जिल्ह्यातल्या कोरोना बाधितांची संख्या २१ ने वाढली असून  कोरोना बाधितांची एकूण संख्या ७६६ झाली आहे. आतापर्यंत ५६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून मंगळवारी वाई तालुक्यातल्या वेळे इथल्याएका बाधिताचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत जिल्ह्यात ३५ रुग्णांचा कोरोना  म्रत्यु झाला आहे .

सांगली जिल्ह्यातल्या आंधळी गावात ६७ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोना पॉझिटिव्ह ६ नवीन रुग्ण आढळले. सध्या १२५ कोरोना रुग्ण उपचाराखाली असून १३५ बरे झाले आहेत.त्यापैकी ५ रुग्ण चिंताजनक आहेत. आजपर्यंत मृत रूग्णाची संख्या ९ आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी शहाण्णव कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार अठ्ठावीस झाली आहे. यापैकी एक हजार सहाशे अठ्ठावन्न रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत एकशे त्रेसष्ट बाधितांचा मृत्यू झाला असून एक हजार दोनशे सात रुग्णांवर उपचार सुरू आहे.

अमरावतीमध्ये आज आणखी ७ अहवाल पॉझिटिव प्राप्त झाल्यानं कोरोनाग्रस्तांची संख्या आता ३७५ वर पोहोचली आहे. आतापर्यंत २५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर सध्या ९१ रुग्ण उपचार घेत आहेत.