नवी दिल्ली : पुरी इथल्या जगन्नाथाच्या रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. येत्या २३ जून पासून ही यात्रा सुरु होणार होती. मात्र देशातला कोरोना विषाणू प्रादुर्भाव लक्षात घेता ही यात्रा आणि संबंधित धार्मिक विधी यांना परवानगी देता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायलयाचे मुख्य न्यायमुर्ती शरद बोवडे, न्यायमुर्ती दिनीश महेश्वरी आणि ए. एस बोपण्णा यांच्या पीठानं स्पष्ट केलं.