पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात दररोज नवीन कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आजपर्यंत शहरातील 54 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे महापालिकेने काही भाग सील केला आहे.
महापालिकेकडून शहरात कोरोनाचे किती रुग्ण आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती असलेला क्षेत्रीय कार्यालनिहाय नकाशा दररोज प्रसिद्ध केला जातो. त्यामध्ये कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत सर्वाधिक 19 रुग्ण आहेत. ‘ब’ आणि ‘ड’ प्रभाग अद्यापपर्यंत कोरोनामुक्त आहेत.
क्षेत्रीय कार्यालयानिहाय रुग्ण संख्या
‘अ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संभाजीनगर, मोहननगर, आकुर्डी, प्राधिकरण, आनंदनगर, भाटनगर भागात (कोरोनाचा एक पॉझिटीव्ह रुग्ण आहे)
‘ब’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या रावेत, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड, काळेवाडी भागात (कोरोनाचा एकही रुग्ण नाही).
‘क’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा, बोऱ्हाडेवाडी), धावडेवस्ती, इंद्रायणीनगर भागात (कोरोनाचे नऊ रुग्ण आहेत)
‘ड’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव भागात (कोरोनाचा एकही रुग्ण नाही).
‘इ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी भागात (कोरोनाचे सर्वाधिक 19 रुग्ण आहेत). काल रात्री पॉझिटीव्ह आलेले दोन रुग्णही च-होली भागातील आहेत.
‘फ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या चिखली, कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर, यमुनागनर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22 या भागात ( कोरोनाचे दोन रुग्ण आहेत).
‘ग’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पिंपरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी भागात (कोरोनाचे चार रुग्ण आहेत).
‘ह’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संत तुकारामनगर, कासारवाडी, दापोडी,फुगेवाडी, कासारवाडी, नवी सांगवी, सांगवी भागात (कोरोनाचे चार रुग्ण आहेत).