नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारा दूरध्वनी आल्यानंतर दक्षिण मुंबईतल्या ताज हॉटेलची सुरक्षाव्यवस्था मुंबई पोलिसांनी कडक केली आहे. ताज हॉटेल वर दहशतवादी हल्ला करण्यात येईल असा दूरध्वनी मध्यरात्री साडेबारा वाजता आला आणि फोन करणाऱ्यानं, तो पाकिस्तानातल्या कराची इथून बोलत असल्याचा दावा केला.

मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेल वरही हल्ला झाला होता हे लक्षात घेऊन आणि काल पाकिस्तानात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, मुंबई पोलिसांनी आज ताज हॉटेल सह मुंबईतल्या सर्व महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्तात वाढ केली आहे.

ताज हॉटेल कडे जाणारे आणि ताज हॉटेल कडून येणाऱ्या सर्व रस्त्यांवर प्रवेश मर्यादित करण्यात आला आहे.