नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात आज १ हजार ९५१ कोरोनाबाधित रुग्णं बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या ९० हजार ९११ झाली आहे. राज्यातलं रुग्णं बरे होण्याचं प्रमाण,५२ पूर्णांक दोन शतांश टक्के झाल्याची माहिती, आरोग्यमंत्रालयानं आज दिली.
कोरोनाच्या ४ हजार ८७८ नवीन रुग्णांची आज राज्यात भर पडली असून एकूण संख्या १ लाख ७४ हजार ७६१ झाली आहे. सध्या राज्यात ७५ हजार ९७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात आज २४५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून त्यातले ९५ मृत्यू मागील ४८ तासातले, तर १५० मृत्यू त्यामागील कालावधीतले आहेत. राज्यातल्या कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची एकूण संख्या आता ७ हजार ८५५ झाली आहे.
राज्यातला आजपर्यंतचा मृत्यूदर ४ पूर्णांक ४९ शतांश टक्के इतका आहे. मुंबईत आज ८९३ नव्या कोरोना बाधितांची भर पडली असून एकूण संख्या ७७ हजार ६५८ झाली आहे.
मुंबईत आज ३६ मृत्यूंची नोंद झाली असून मुंबईतल्या एकूण मृत्यूंची संख्या ४ हजार ५५६ झाली आहे.