नवी दिल्ली : भारतात निर्माण करण्यात येत असलेल्या कोरोनावरील लशीच्य सर्व चाचण्या पूर्ण करून येत्या 15 ऑगस्टपर्यंत ती उपलब्ध करून देण्याचं नियोजन असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं म्हटलं आहे.

कोव्हॅकसिन नावाच्या या लसीच्या मनुष्याप्राण्यावरील चाचण्यांना नुकतीच केंद्रीय औषधे प्रमाणीकरण नियंत्रण संघटनेनं परवानगी दिली आहे. या प्रकल्पाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून, सर्व चाचण्या वेगाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडच्या मदतीने या लसीवरील संशोधन सुरू असून, सर्व वैद्यकीय चाचण्या पूर्ण करून स्वातंत्र्यदिनापर्यंत ही लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेनं विलग केलेल्या सार्स कोविड 2 चा वापर करून ही लस तयार करण्यात येत आहे.