नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ जनतेनं लाभ घ्यावा, असं आवाहन केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमत्त काल जालना तालुक्यातल्या रामनगर इथं आयोजित आरोग्य मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जात आहेत. याशिवाय प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, प्रधानमंत्री मातृत्त्व योजना यासारख्या अनेक योजंनाचा लाभ नागरिकांना लाभ होत असल्याचं दानवे यांनी सांगितलं. जिल्ह्यातल्या बदनापूर, परतूर आणि राजूर इथंही आरोग्य मेळावे आयोजित करण्यात आलं होतं . या आरोग्य मेळाव्यांमध्ये हजारो रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.