नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत विस्थापित मजूर आणि शिधापत्रिका नसलेल्यांना मोफत तांदूळ आणि हरभरे वाटप करण्याला येत्या १० जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रणेतल्या पात्र लाभार्थ्यांना मे आणि जून महिन्याकरिता मोफत तांदळाचे वितरण सुरू आहे.
आतापर्यंत 1 हजार 58 टन मोफत तांदळाचे वितरण करण्यात आलं आहे. पात्र लाभार्थ्यांनी निश्चित करण्यात आलेल्या केंद्रामधून कोणतीही गर्दी न करता योजनेतील धान्य सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून तसेच मास्कचा वापर करून धान्य घ्यावं असं आवाहन करण्यात आलं आहे.