मुंबई (वृत्तसंस्था) : शासनाने नुकसानग्रस्तांसाठी दिलेल्या पावणे चारशे कोटींच्या निधी पैकी १३४ कोटींचा निधी प्रशासनाने बँकांकडे वर्ग केला आहे, मात्र बँकांच्या ढिसाळ कारभारामुळे हा निधी नुकसानग्रस्तांच्या खात्यात जमा झालेला नाही असा आरोप रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केला आहे.
अलिबागेत काल पत्रकारांशी बोलताना तटकरे म्हणाले, बँकांनी आपले कर्मचारी आणि कामाचे तास वाढवून वर्ग झालेली रक्कम नुकसानग्रस्त नागरिकांच्या खात्यावर जमा करावी अशी सूचना बँकांना देण्यात आली आहे. सुपारी आणि माडांच्या नुकसानीसाठी झाडानुसार मदत मिळावी यासाठी आपण अर्थमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली असल्याचं त्यांनी सांगितलं.