नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ चा प्रसार रोखण्यासाठी, तसंच कोविड बाधित रुग्णांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन उपाययोजना करत असून, राज्यातल्या  कोविड  बाबतच्या आणखी काही सुविधांचं उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं

राज्यात कोविड बाधित पहिला रुग्ण आढळून आल्यापासून राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांना यश मिळत असून, काल बरे झालेल्या ३ हजार ५२२ रुग्णांसह गेल्या पाच दिवसांत एकूण १५ हजार रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले.  त्यामुळे राज्यात आतापर्यंत उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १५ हजार २६२ झाली आहे. राज्याचा कोविड बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ५४ पूर्णांक ३७ शतांश तर मृत्यू दर ४ पूर्णांक २६ शतांशवर पोहोचला आहे.

दरम्यान, कोविड बाधित रुग्णांबरोबर होणारा आरोग्य सेवकांचा संपर्क कमी व्हावा, यासाठी मुंबई महानगरपालिकेनं रोबोटिक ट्रॉलीचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून, रुग्णांना अन्न देताना तसंच रुग्णांशी संबंधित अन्य कामाच्या वेळी लागणाऱ्या  PPE कीट्सची संख्या कमी होईल.