नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेलं राजगृहावर काल दोन अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. घराच्या परिसरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली असून घराच्या काचांवरही दगडफेक केली आहे. यामध्ये घरातल्या कुंड्यांचं जास्त नुकसान झालं आहे.
राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असून त्यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधलं होतं. जगभरातून आंबेडकर अनुयायी आणि नागरिक इथं येत असतात. पोलीसांनी घटनास्थळाची तपासणी केली असून त्यांनी आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचं सीसीटीव्ही फुटेज घेतलं आहे. माटुंगा पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तिंविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.