नवी दिल्ली : राज्यात शिवभोजन थाळीचा दर पुढच्या तीन महिन्यांसाठी पाच रुपये करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. केशरी शिधापत्रिकाधारकांना जुलै ते ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी सवलतीच्या दरानं अन्नधान्य देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
याशिवाय टाळेबंदीच्या काळात निर्माण झालेल्या अतिरिक्त दुधाच्या नियोजन योजनेला मुदतवाढ, कौशल्यविकास आणि उद्योजगता विभागाचं ‘कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजगता विभाग’ असं नामकरण, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम टप्पा दोन राज्यात राबवायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.
आयडीबीआय बँक, महाराष्ट्र प्रादेशिक ग्रामीण बँक या शासकीय मालकीच्या बँकांना, तसंच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार हाताळायला देखील परवानगी देण्यात आली आहे.