मुंबई : मुंबई ठाणे शिधावाटप यंत्रणेअंतर्गत भांडूप येथे दक्षता पथकामार्फत 15 लाख 60 हजार  550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व नागरी पुरवठा मुंबईचे संचालक कैलास पगारे यांनी दिली.

लॉकडाऊनच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत दिनांक 06 जुलै 2020 रोजी दक्षता पथकाकडून भांडूप विभागात ट्रक क्र.एम.एच.-05-ए.एम.-1633 मधून अवैधरित्या अन्नधान्य वाहतूक प्रकरणी तांदूळ 17500 कि.ग्रॅ., गहू 1800 कि.ग्रॅ. जप्त करण्यात आलेला असून भांडूप पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हा नोंद क्र.58/2020 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.  या  गुन्हा नोंद प्रकरणी रुपये 15 लाख 60 हजार 550 रूपये इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.