नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात येणार असल्याचं मंडळानं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

हे निकाल www.mahresult.nic.in, www.hscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com या संकेतस्थळावर पाहाता येणार आहे. या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण पाहाता येणार असून विद्यार्थ्यांना आपल्या माहितीची प्रिंटआऊट घेता येणार आहे.

विद्यार्थी आपल्या गुणांची पडताळणी, छायाप्रत, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रांसाठीच्या अटी आणि शर्ती  http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर देण्यात आल्या असून गुणपडताळणीसाठी १७ जुलै ते २७ जुलै तर छायाप्रतींसाठी १७ जुलै ते ५ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार आहे.