पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोविड-१९ संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती मा. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड-१९ वॉर रुमला त्यांनी भेट दिली. त्यावेळी मा. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणार्या उपाययोजनांची माहिती त्यांना दिली.

यावेळी मा. विभागीय आयुक्त कार्यालयाचे कार्याधिकारी सौरभ राव, मा. शिक्षण आयुक्त मनोज सोळंके, मा. अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रवीण तुपे, मा. उपायुक्त सुभाष इंगळे, मा. अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, मा. मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण आदी उपस्थित होते.