नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ शी निगडीत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ- सी पी सी बी नं नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

वापरलेले मास्क आणि हातमोजे याचे आधी तुकडे करुन ते कागदामध्ये ७२ तास गुंडाळून ठेवावेत आणि त्यानंतरच ते फेकून द्यावेत अशी सूचना सी पी सी बी नं केली आहे.

शॉपिंग माल, संस्था तसंच इतर कार्यालयांनी पीपीई कीट बाबतही हीच काळजी घ्यायची आहे असही सी पी सी बी नं म्हटलं आहे.