नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सहाशे कोटी रुपयांहून अधिक रकमेची करचुकवेगिरी केल्या प्रकरणी जीएसटी अन्वेषण महासंचालनालयानं, काल, तीन कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केल्याचं, केंद्रीय अर्थ मंत्रालयानं सांगितलं.

फोर्च्युन ग्राफिक्स लिमिटेड, रीमा पॉलिकेम प्रायव्हेट लिमिटेड आणि गणपती एन्टरप्रायझेस, या त्या तीन कंपन्या असून, कोणताही माल पुरवठा न करताच त्यांनी पावत्या तयार केल्याचं आढळून आलं आहे.