पुणे : पुणे पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात ध्वनी प्रदुषण नियंत्रणासाठी संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीमधील अध्यक्ष व सदस्य यांच्या बदल्या झाल्याने ध्वनी प्रदुषण नियंत्रणासाठी संनियंत्रण समितीची नव्याने स्थापना करण्यात आली असल्याची माहिती पुणे शहर पोलीस उप आयुक्त मितेश घट्टे यांनी दिली.
नविन ध्वनी प्रदुषण नियंत्रणासाठी संनियंत्रण समिती पुढीलप्रमाणे:- पुणे शहर पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे हे अध्यक्ष असून दुरध्वनी क्रमांक 020-26122784, ई-मेल आयडी jtcp.pune@nic.in तर सदस्य पुणे शहर परिमंडळ-1 चे पोलीस उप आयुक्त श्रीमती स्वप्ना गोरे दुरध्वनी क्रमांक 020-24454450, ई-मेल आयडी dcpzone1.pune@nic.in, पुणे शहर परिमंडळ-2 चे पोलीस उप आयुक्त शिरीष सरदेशपांडे 020-26334249/387 ई-मेल आयडी dcpzone2.pune@nic.in, पुणे शहर परिमंडळ-3 चे पोलीस उप आयुक्त श्रीमती पोर्णिमा गायकवाड 020-27487777/226 ई-मेल आयडी dcpzone3.pune@nic.in, पुणे शहर परिमंडळ-4 चे पोलीस उप आयुक्त पंकज देशमुख 020-26684001 dcpzone4.pune@nic.in, पुणे शहर परिमंडळ-5 चे पोलीस उप आयुक्त सुहास बावचे 020-26861212 dcpzone5.pune@nic.in, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, जे.बी.संगेवार 020-25811694/25811627 9869440149 ropune@mpcb.gov.in या सर्व अधिकाऱ्यांचा या समितीत समावेश आहे.