नवी दिल्ली : एअर मार्शल व्ही आर चौधरी एव्हीएसएम,व्हीएम यांनी 1 ऑगस्ट 2020 रोजी भारतीय हवाई दलाच्या पश्चिम हवाई कमांडचे हवाई अधिकारी कमांडिंग इन चीफ म्हणून सूत्रे स्वीकारली. एअर मार्शल बी सुरेश पीव्हीएसएम, एव्हीएसएम,व्हीएम आणि एडीसी यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली.
एअर मार्शल व्ही आर चौधरी, भारतीय हवाई दलाच्या लढाऊ तुकडीत लढाऊ वैमानिक म्हणून ते 29 डिसेंबर 1982 मध्ये रुजू झाले. 38 वर्षाच्या आपल्या झळाळत्या कारकिर्दीत त्यांनी विविध प्रकारची लढाऊ विमाने आणि प्रशिक्षण विमानाची उड्डाणे केली आहेत. मिग -21, मिग-23एमएफ, मिग-29 आणि सुखोई -30 या विमानांच्या उद्द्नांचा उड्डाणाचा 3800 तासाचा अनुभव आहे.
भारतीय हवाई दलाच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. फ्रंटलाइन फाइटर स्क्वाड्रनचे ते कमांडिंग ऑफिसर होते. एअर व्हाइस मार्शल म्हणून त्यांनी हवाई दल मुख्यालय वायू भवन इथे सहाय्यक चीफ ऑफ एअर स्टाफ ऑपरेशन्स (एअर डिफेन्स), असिस्टंट चीफ ऑफ एअर स्टाफ (कार्मिक अधिकारी) म्हणून काम केले आहे. आताच्या नियुक्तीपूर्वी पूर्व हवाई कमांडचे वरिष्ठ एअर स्टाफ ऑफिसर म्हणून ते काम करत होते. वेलिंग्टन इथल्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे ते माजी विद्यार्थी आहेत.
त्यांच्या अद्वितीय सेवेचा गौरव म्हणून 2004 च्या जानेवारीत त्यांना वायू सेना पदकाने तर 2015 च्या जानेवारीत अति विशिष्ट सेवा पदकाने गौरवण्यात आले.