नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात दूरसंवाद सेवा सुरु झाल्याला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल  या उद्योगाचं एका पत्राद्वारे अभिनंदन केलं आहे.

या निमित्त काल  दूरसंवाद विभाग आणि भारतीय सेल्युलर ऑपरेटर संघटनेतर्फे एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होते. २५ वर्षांपूर्वी दळणवळण हि विशेष बाब होती मात्र आज ते सक्षमीकरणाचं एक महत्वाचं साधन असून, सामाजिक, आर्थिक आणि माहिती क्षेत्रांत त्याची महत्वाची भूमिका असल्याचं पंतप्रधानांनी पत्रात म्हंटल आहे.

दूरसंचार क्षेत्रांचं यश सरकारन सुरु केलेल्या डिजिटल इंडिया उपक्रमाला अनुलक्षून असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे.