मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता नाशिक महानगरपालिकेनं यंदाच्या गणेशोत्सवात गणेश आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकांना मनाई केली आहे. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आज याबाबतची अधिसूचना जारी केली.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी चार फूट तर घरगुती गणेशोत्सवासाठी दोन फूट उंचीची मूर्ती असावी, गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश भक्तांना ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी,

गणेशोत्सवानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन न करता पुढल्या वर्षी माघी गणेशाच्या विसर्जनाच्या वेळी किंवा थेट पुढच्या अनंत चतुर्दशीला गणेश मूर्तीचं विसर्जन करावं असं आव्हान जिल्हाधिकाऱ्यांनी  केलं आहे.