नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरिन सिंग यांनी काल दूरदष्य प्रणाली द्वारे इंफाळ इथं दोन जलद गती न्यायालयाचं उद्घाटन केलं. गेल्या साडेतीन वर्षात महिलांच्यावर झालेल्या अत्याचारांचे खटले यामुळे जलद गतीने निकाली काढता येतील असं त्यांनी यावेळी सांगितलं.

त्यामुळं महिलांना लवकर न्याय मिळेल, असंही ते म्हणाले. तिथं या स्वरुपाचे ९५१ खटले सध्या प्रलंबित आहेत. दोन निवृत्त न्यायाधिशांची या जलदगती न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.