मुंबई (वृत्तसंस्था): राज्यात काल नव्याने आढळलेल्या कोविड १९ च्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त होती. काल १ हजार ६८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले, १ हजार ५५३ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर २६ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ पूर्णांक ३८ शतांश टक्के झाले आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णांची संख्या काल मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वाधिक, ३१९ होती. नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, आणि सांगली जिल्ह्यात महापालिका क्षेत्रापेक्षा ग्रामीण भागात आढळणाऱ्या नवबाधितांची संख्या जास्त आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६५ लाख ८९ हजार ९८२ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६४ लाख १६ हजार ९९८ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ३९ हजार ७६० रुग्ण दगावले. सध्या राज्यात २९ हजार ६२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. वर्धा, वाशीम, गोंदिया, भंडारा, नंदूरबार या पाच जिल्ह्यांमध्ये उपचाराधीन रुग्णसंख्या पाच अथवा त्यापेक्षा कमी आहे. पुणे, मुंबई, ठाणे, अहमदनगर, रायगड, सातारा या सहा जिल्ह्यांमध्ये मात्र उपचाराधीन रुग्णसंख्या अजूनही हजाराच्या घरात आहे.