मुंबई (वृत्तसंस्था) : पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांनी आज सकाळी गडचिरोली जिल्ह्यात देचलीपेठा आणि भामरागड धोडराज या अतिदुर्गम, आणि नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल पोलिस ठाण्यांना भेट देऊन तिथल्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.

तिथल्या जवानांच्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या.नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी शासन पोलिसांना सुरक्षाविषयक सर्व सुविधा पुरवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिस अधिकारी आणि जवानांना काही सूचनाही नगराळे यांनी यावेळी दिल्या.

त्यानंतर नगराळे यांनी अहेरी येथील प्राणहिता पोलिस मुख्यालयात आढावा बैठक घेऊन शूर जवानांचा सत्कार केला. याप्रसंगी पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.