नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाराणसीतल्या संस्कृत विद्यालयांमधल्या पारंपरिक वेषात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यांचे संस्कृतमधले समालोचन आजच्या मन की बात मध्ये ऐकायला मिळाले. त्या आधारे पंतप्रधानांनी समालोचनाचे महत्व विशद केले.
दूरचित्रवाणी येण्याआधी नभोवाणीवरील समालोचनानेच क्रिकेट आणि हॉकीच्या मैदानावरील रोमांच घराघरात पोहोचवला होता, भारतीय खेळांचेही असेच रंजक समालोचन व्हायला हवे असे मत पंतप्रधानांनी मन की बात मधून व्यक्त केले.
आता परीक्षांचा काळ येतो आहे, सर्व परिक्षार्थींना शुभेच्छा, यंदाही मार्च महिन्यात “परीक्षा पे चर्चा’’ करूच. त्यासाठी सूचना पाठवा, चर्चेत सहभागी व्हा असे आवाहन पंतप्रधानांनी केले.