नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूने शरीरात प्रवेश केल्यानंतर लक्षण दिसायला आता ८ दिवसांपर्यंतचा वेळ लागू शकतो. तर १० टक्के रुग्णांसाठी हा कालावधी १४ दिवसांचा आहे. पूर्वी हा कालावधी ४ ते ५ दिवसांचा होता. जर्नल सायन्स अडव्हान्समध्ये यासंदर्भातलं संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. एक हजार पेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांचा अभ्यास यात करण्यात आला.

चीनमधल्या पेकींग विद्यापीठातले शास्त्रज्ञ चोंग यु यांनी हे संशोधन केलं आहे. यामुळं १४ दिवसांच्या विलगीकरण कालावधीचा पुनर्विचार करावा लागू शकतो. मात्र सर्वांना हे लागू होऊ शकेलच याबद्दल निश्चित सांगता येणार नाही. काही ठिकाणी विषाणूनं वेगळं स्वरुपही धारण केलेलं असू शकतं असं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.