स्वातंत्र्य सैनिक, कोरोना योद्धे व उपस्थितांना दिल्या शुभेच्छा
पुणे : भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते येथील विधानभवनाच्या (कौन्सिल हॉल) प्रांगणात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त सौरभ राव, प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्यासह जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, निवृत्त अधिकारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर त्यांनी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित असणाऱ्या लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे, स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेऊन विचारपूस केली तसेच स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय- प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण झाले. यावेळी त्यांच्या पत्नी तसेच प्रभारी अपर जिल्हाधिकारी सुधीर जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप विभागीय अधिकारी संतोष कुमार देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावी, अन्न धान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे, श्रावण ताते, सुनंदा जठार तसेच इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.