नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गावर उपचार करून घ्यायला तयार नसणाऱ्या रुग्णांपासून डॉक्टर, परिचारिका तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य सुरक्षा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत.

कोरोना विषाणू संसर्गावर उपचार करून घ्यायला तयार नसणाऱ्या रुग्णांपासून डॉक्टर, परिचारिका तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य सुरक्षा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेल्या या निर्देशात, उपचारांबाबत उदासीन असलेल्या अशा रुग्णांपासून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना असलेला धोका पाहता त्यांना योग्य सुरक्षा देण्यास सांगितलं आहे.