नवी दिल्ली : भारतीय हवामानखात्याच्या चक्रीवादळ इशारा विभागानुसार, पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिम-उत्तर पश्चिमेकडे सरकला असून त्याची तीव्रता वाढली आहे. यामुळे दक्षिण कोकण आणि गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटकात मुसळधार पावसाचा इशारा देण्यता आला आहे.
13 ऑक्टोबर रोजी मुसळधार (>20 सेंमी प्रतिदिन) पाऊस दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात होईल. तर, 14 ऑक्टोबर रोजीसुद्धा मुसळधार (>20 सेंमी प्रतिदिन) एवढा पाऊस कोकण आणि गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात होण्याची शक्यता आहे.
हवामानखात्याचे स्थितीवर सातत्याने लक्ष आहे आणि संबंधित राज्य सरकारांना नियमितपणे माहिती दिली जात आहे.
अधिक माहितीसाठी www.rsmcnewdelhi.imd.gov.in, www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या
Date/Time(IST) |
Position (Lat. 0N/ long. 0E) |
Maximum sustained surface wind speed (Kmph) |
Category of cyclonic disturbance |
12.10.20/1130 |
15.9/84.8 |
50-60 gusting to 70 |
Deep Depression |
12.10.20/2330 |
16.7/83.1 |
55-65 gusting to 75 |
Deep Depression |
13.10.20/1130 |
17.1/81.7 |
45-55 gusting to 65 |
Depression |
13.10.20/2330 |
17.5/80.3 |
25-35 gusting to 45 |
Well marked low |
* * *